पुणे :  नोट बंदीनंतर नागरी सहकारी बँकांवर घालण्यात आलेले निर्बंध उठवा अन्यथा राष्ट्रीयकृत बँका फोडू... असा इशारा नागरी सहकारी बँकांनी पुण्यात काढलेल्या मोर्चात देण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरी सहकारी बँकांनी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. नागरी सहकारी बँकांच्या मागण्यांवर सात दिवसात निर्णय घ्यावा. अन्यथा , बँका बेमुदत बंद ठेवू. तसेच राष्ट्रीयकृत बँका फोडू. असा इशारा या मोर्चात देण्यात आला. 


राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका यांच्याप्रमाणे नागरी बँकांना देखील नवीन चलनाचा पुरवठा केला जावा. नागरी बँकांकडे पडून असलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकाराव्यात. 


खातेदारांना नागरी बँकांमधील त्यांच्या खात्यात जुन्या नोटा भरण्यास परवनगी द्यावी. या नागरी सहकारी बँकांच्या प्रमुख मागण्या आहेत.