कर्जमाफीच्या मागणीसाठी अडवला अर्थमंत्री मुनगंटीवारांचा ताफा
शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवण्यात आला. स्वाभिमानी सांभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दहा मिनिटाहून अधिक वेळ मुनगंटीवारांचा ताफा अडवून कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी केली.
नांदेड : शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नांदेडमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा ताफा अडवण्यात आला. स्वाभिमानी सांभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दहा मिनिटाहून अधिक वेळ मुनगंटीवारांचा ताफा अडवून कर्जमाफी करण्याची घोषणाबाजी केली.
अर्थसंकल्प सादर करण्याआधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. त्याचेच पडसाद उमटताना दिसतायत. कॅनॉल रोडवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. मंत्रीमहोदयांनी गाडीतून खाली येऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र, मुनगंटीवार गाडीतून खाली उतरले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी बाळाचा वापर करून कार्यकर्त्यांना दूर केलं.