ठाणे : घरात लग्न कार्य असेल तर माता-पित्यांना अडीच लाख रुपये बँकेतून काढता येतील आणि त्यासाठी बँकेत फक्त लग्न पत्रिका सादर करावी लागेल अशी घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी केली होती. मात्र, लग्न पत्रिकेसोबतच बँकेला अॅफिडिव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्रंही सादर करावे लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा प्रकार ठाण्यात समोर आलाय. ठाण्यात सिद्धार्थ नगर आंबेरकर कुटुंबात मुलाचे लग्न चार डिसेंबरला होणार आहे. घरात लग्नाची तयारी सुरु आहे. मात्र नोटाबंदीच्या निर्णयानंतर आंबेरकर कुटुंबियांची तारांबळ उडाली.


गुरुवारी सरकारने लग्नपत्रिका दाखवून पैसे उपलब्ध होतील असे सरकारने जाहीर केलं. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासून नियोजित वर तुषार आंबेरकरांच्या वडिलांनी बँकेत रांग लावली. मात्र, नंबर आला तेव्हा त्यांना लग्न पत्रिकेसोबत प्रतिज्ञापत्र आवश्यक असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. 


त्यामुळं लग्नाची तयारी सुरु असताना प्रतिज्ञापत्र कसं सादर करायचं? असा संतप्त सवाल तुषार आंबेरकर यांच्या वडिलांनी उपस्थित केला. नोटाबंदीनंतर नेहमीच बदलणाऱ्या नियमांनी नागरिकांना हैराण केलंय.