मुंबई: मेक इन इंडियाचा भाग असलेल्या मेक इन मुंबईचा समारोप झाला आहे. समारोपाच्या या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेल्फी काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मोबाईलनं हा सेल्फी फोटो काढला. या सेल्फी फोटोत दोन्ही नेत्यांनी हाताच्या मुठी आवळून आपण एकत्रच असल्याचे दाखवून दिलंय. 


सत्तेत एकत्र यूतीचं सरकार असूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात सतत तू तू मै मै सुरू असतं, त्यामुळे हा सेल्फी युतीचा संसार सुखकर करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


मेक इन मुंबई कार्यक्रमात शिवसेनेनं स्वत:च्या अजेंड्याची चित्रफीत दाखवली. ही चित्रफीत म्हणजे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे स्वप्न, अशा प्रकारे याचं सादरीकरण झालं. माझं स्वप्न साकार करण्यासाठी फडणवीस साहेब मी तुमच्याशी सामंजस्य करार केलाय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. 


आम्ही केवळ सरकारमध्ये तुमच्या बरोबर नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी दिलं.