नागपूर : साठाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशभरातील लाखो अनुयायी यानिमित्त दीक्षाभूमीवर दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं येणा-या बौद्ध बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. दीक्षाभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


 विजयादशमीच्याच दिवशी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो.