बीड : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा पार धुव्वा उडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८ पैकी १४ जागांवर आघाडी घेतलीय. तर भाजप उरलेल्या चार जागांवर आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं त्यांच्या भगिनी आणि खासदार प्रीतम मुंडे यांनीही मैदानात उडी घेतली होती. एवढंच नव्हे तर पंकजा मुंडे यांनी विविध कार्यकारी सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य असलेल्या अनेक मतदारांना सहलीसाठी परदेशात नेलं होतं. 


विशेष म्हणजे या सर्व मतदार थेट मतदान केंद्रावरच मतदान करण्यासाठी हजर झाले होते. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या ताब्यात असलेली बाजार समितीत पंकजा हिरावून नेतात की काय अशी चर्चा रंगली होती. मात्र परळीकरांनी आपला कौल पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या पारड्यात टाकला.