कर वसुलीसाठी धुळे महापालिकेची घरपोच सेवा
धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे.
धुळे : धुळे महापालिकेत जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांचा जणू पाऊसच पडला आहे. गेल्या पंधरवड्यात महापालिकेत तब्बल १४ कोटीपेक्षा जास्त कर वसुली झाली आहे. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर थकीत आणि चालू कर भरण्यासाठी नागरिकांनी महापालिकेत रांगा लावल्या आहेत.
सरासरी दररोज एक कोटी रुपयांची वसुली केली जात आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांनी स्वतः या कर वसुलीकडे लक्ष घातले आहे. जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी पालिकेने घरपोच कर वसुली सुरु केली आहे.
विशेष म्हणजे या अश्या नागरिकांच्या घरी पालिका कर्मचारी कर भरणा करीत आहे. सुरुवातील अवघ्या काही दिवसात तब्बल पाच कोटींची कर वसुली झाली होती. महापालिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कराचा भरणा नागरिक पालिकेत येऊन करीत आहेत.