धुळे : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत रंगीबेरंगी  झालर असणारे आकाश कंदिल दिवाळीची चाहूल लागताच विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पारंपरिक आकारांबरोबरच नवीन प्रकारचे आखीव-रेखीव कलाकुसरीचे आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत.  


धुळे शहररासह परिसरातील बाजारपेठ दिवाळीच्या साहित्यांनी गजबजली आहे. 


घरासह अंगण आणि परिसर उजळून  प्रकाशमय करण्या-या विविध रंगी आकाश कंदिलांनी सध्या बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत सुमारे ५० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंतचे  विविधरंगी आकाश कंदील  विक्रीसाठी आले आहेत.