शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांना एका अज्ञात भक्तानं सव्वा कोटीचं हिऱ्यांचं पेंडंट दान दिलंय.


हा दानशूर भक्त कोण आहे हे समजू शकलेलं नाही कारण, ही चैन आणि पेंडंटचं त्यानं गुप्त स्वरुपात दान दिलंय.
 
साईबाबांना आलेल्या हिऱ्या -मोत्यांचं वर्षांतून दोन वेळा मूल्यांकन केलं जातं. या मूल्यांकनावेळी ही बाब समोर आली.