बीड: मराठवाड्यातली तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता तिथले बियर कारखाने बंद करावेत अशी मागणी होत आहे. पण या मुद्द्यावरून भाजप सरकारमधल्याच दोन मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. 


'मंगळवारपर्यंत निर्णय घेऊ'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यातले बियर कारखाने बंद करण्याबाबत मंगळावरपर्यंत निर्णय घेऊ असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. 


पंकजा मुंडेंचं अजब वक्तव्य


बियर तयार करणाऱ्या कारखान्यांना दिले जाणारे पाणी हे काही पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी नाही,ते उद्योगासाठी आरक्षित केलेले पाणी आहे, त्यामुळे या कारखान्यांना दिले जाणारे पाणी बंद करणे योग्य होणार नाही असं मत बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. 


बियर कारखान्यांना दिले जाणारे पाणी हे आरक्षित आहे,जर ते बंद केले तर फार काही फरक पडणार नाही,उलट कारखाने बंद झाले तर अनेक लोकांच्या हाताचे काम बंद होईल,अनेक लोक बेरोजगार होतील ते योग्य होणार नाही असेही पंकजा यांनी सांगितले.