दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक
दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रात्री पेट्रोलिंग करत असताना वरचा मोहल्ला गणपती मंदिर परिसरात एका घरातील लाईट चालू असल्याचे पोलिसांना आढळले. त्यानंतर पाहाणी केली असता या घरात फावडे आणि तिकावाच्या साहाय्याने खोदकाम करण्यात असल्याचं दिसले. बाजूला एका ठिकाणी पूजा मांडण्यात आली होती.
पोलिसांना संशय आल्याने अखेर पोलिसांनी त्या घरावर धाड टाकली. याप्रकरणी मुंबईतून आलेल्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासोबत दोन गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. हे घर दीडशे वर्षांपूर्वीचं असल्याचे सांगण्यात येत आहे.