VIDEO : दुष्काळासाठी जबाबदार साईबाबा की सरकार?
शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
मुंबई : शिर्डीच्या साईबाबांच्या पूजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय, असं नुकतंच स्वामी शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटलं होतं.
'साईंची पूजा अपूज्य आहे. सोबतच आपल्या देवतांचा अपमान केला जातोय. साईबाबांची मोठी मूर्ती बनवून गणेश आणि हनुमानजींना त्यांच्या पायांशी बसवलं जातंय... हे महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात घडतंय. त्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय', असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याच विषयावर झालेली ही चर्चा सध्या वायरल होताना दिसतेय.