वादग्रस्त योगगुरु अमेरिकेत नाही, तर लोणावळ्यात आहे
सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर `हॉट योगगुरू` म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रम चौधरी आता भारतात परतलाय. सध्या लोणावळ्यात त्यानं आपलं हेड क्वार्टर बनवलंय.
लोणावळा : सेक्स स्कँडलमध्ये फसल्यानंतर 'हॉट योगगुरू' म्हणून प्रसिद्ध असलेला विक्रम चौधरी आता भारतात परतलाय. सध्या लोणावळ्यात त्यानं आपलं हेड क्वार्टर बनवलंय.
जवळपास ४० वर्षांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झालेला चौधरीचा आता भारतात आपलं बस्तान बसविण्याच्या उद्देश आहे. विक्रम चौधरीला लवकरच मुंबईत हॉट योगा क्लासेस सुरू करायचेत.
लैंगिक छळाचा आरोप सिद्ध
अमेरिकेत चौधरीवर त्याची वकील मीनाक्षी जफ्फा बड्डेन यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर चौधरीवर जवळपास सहा करोड रुपयांचा दंड लावण्यात आला होता. त्यानंतर चौधरीनं आपलं लॉस एन्जेलिसस्थित आंतरराष्ट्रीय हेडक्वार्टर आणि स्टुडिओ बंद केलाय.
अॅम्बी व्हॅलीत बस्तान
यानंतर चौधरीनं आता अॅम्बी व्हॅलीमध्ये आपलं बस्तान बसवलंय. दोन वर्ष कालावधीचं टीचर ट्रेनिंग क्लासेस त्यानं आता सुरू केलेत.