हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम
राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली.
पुणे : राज्यात झालेल्या हेल्मेट सक्तीला पुण्यामध्ये जोरदार विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर हेल्मेट विरोधक आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामध्ये बैठक झाली.
पण हेल्मेट सक्तीवर दिवाकर रावते ठाम आहेत. हेल्मेट सक्ती ही फक्त पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यात आहे, अशी प्रतिक्रिया दिवाकर रावतेंनी या बैठकीत दिली आहे.
परिवहन मंत्री आपल्या हेल्मेट सक्तीच्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पुण्यात हेल्मेट सक्तीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी या हेल्मेट सक्तीला विरोध केला आहे.