ठाणे : उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्याने 16 लहान मुलांना आणि दोन महिलांना चावा घेतलाय. सर्व मुले 3 ते 5 वर्षाची आहेत. सोमवारी दुपारी 2 च्या सुमाराला सी ब्लॉक रोड ते कॅम्प नं 3 च्या परिसरात 15 ते 16 लहान मुले खेळत असतांना अचानक एका कुत्र्याने या मुलांवर हल्ला केला आणि त्यांच्या हात आणि गालावर चावा घेतला. या घटनेत ही लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. 


घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. दरम्यान 15 लोकांवर उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे, तर एक लहान मुलगी आणि एका महिलेवर या रुग्णालयात उपचार सुरु आहे.