डोंबिवलीकरांनी अनुभवला गोविंदाचा धिंगाणा
बेभान होऊन दहीहंडीसाठी गावभर फिरणा-या गोविंदांच्या दादागिरीचा अनुभव डोंबिवलीतल्या नागरिकांना आला. शहरभर नुसता धिंगाणा आणि गोंगाट घालत फिरणा-या गोविंदा पथकातल्या युवकांना रस्ता म्हणजे केवळ आपली जहागिरी असं वाटत होतं. याचा फटका केडीएमटीच्या बसमधल्या प्रवाशांनाही बसला.
डोंबिवली : बेभान होऊन दहीहंडीसाठी गावभर फिरणा-या गोविंदांच्या दादागिरीचा अनुभव डोंबिवलीतल्या नागरिकांना आला. शहरभर नुसता धिंगाणा आणि गोंगाट घालत फिरणा-या गोविंदा पथकातल्या युवकांना रस्ता म्हणजे केवळ आपली जहागिरी असं वाटत होतं. याचा फटका केडीएमटीच्या बसमधल्या प्रवाशांनाही बसला.
15 ते 20 दुचाकी रस्त्यातून बसला अगदी खेटून जात असताना एका बाईकला बसचा हलका धक्का लागला. त्यावर 50 ते 60 गोविंदांनी बस जबरदस्तीने थांबवली. प्रवाशांना जबरदस्ती खाली उतरवलं. काही केल्या गोविंदा बस सोडायला तयार नव्हते. अखेर मीडिया घटनास्थळी पोहोचल्यावर घाबरलेल्या गोविंदांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पुढे ते बसची वाट पाहात असल्याचं लक्षात आल्यावर बस पोलीस संरक्षणात पुढे न्यावी लागली.