तिने शेअर केली सोशल मीडियावर घरगुतीबाब आणि जिवाला मुकली
शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
पुणे : शहरातील हडपसर येथे एक धक्कादायक घटना घडली. संशयावरून पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केलीय. सोशल मीडियावर घरगुती समस्या शेअर केल्याने चिडलेल्या पतीने आपल्या पतीची हत्या केली.
राकेश गांगुर्डे यांनी आपली पत्नी सोनाली गांगुर्डे (३१) हिची हत्या करुन स्वत:हा देखील आत्महत्या केलीय. दोघेही उच्चशिक्षित असल्याने सगळीकडे खळबळ माजलीय. पत्नी सोनाली ही कौंटुबिक आय़ुष्यातील खासगी गोष्टी सोशल मिडीयात पोस्ट करुन शेअर करायची याचाच राग येऊन राकेशनी सोनालीचा खून केला. खुनानंतर सुसाईड नोट लिहून राकेशनेही आत्महत्या केलीय.
गांगुर्डे दांपत्य तिन वर्षेपूर्वी ते हडपसर येथे राहण्यासाठी आले होते. बुधवार दुपारपासून माझी बहिण फोन उचलत नाही म्हणून सोनालीची बहिण फ्लॅटवर आली असता हा प्रकार उघड झाला.
मूल होत नव्हते त्याबाबत पत्नी ही व्हॉटसअप आणि फेसबूक चॅटमधून फॅमिली प्लानिंग ट्रिटमेंटच्या घरगुती गोष्टी तिच्या मित्र- मैत्रींना सांगायची. अशी माहिती पतीने आपल्या सुसाईड नोटमध्ये दिली आहे. मूल होत नसल्याने तिने ही बाब व्हाटस्अॅप आणि फेसबूकवरुन आपल्या मित्रांना चॅटद्वारे शेअर केली. त्यामुळे उच्चशिक्षित पती राकेश गांगुर्डे याचा राग अनावर झाला. संतापलेल्या राकेशनी सोनाली हिची हत्या केली. त्यानंतर त्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मूल होत नव्हतं त्याबाबत सोनाली ही व्हॉटसअप आणि फेसबुक चॅटमध्ये पतीबद्दल फॅमिली प्लानिंग ट्रिटमेंटच्या घरगुती गोष्टी तिच्या मित्रांना सांगायची म्हणून हे कृत्य केल्याचा उल्लेख राकेश यांच्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिक तापस पोलीस करीत आहेत.