कोल्हापूर : ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं पुण्यात निधन झाले. ते आता 81 वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 नोव्हेंबर 1995 ते 31 ऑक्टोबर 2000 या कालावधीत त्यांनी कुलगुरूपद भूषवलं होतं. पुणे विद्यापीठातही त्यांनी समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले होते. नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. 


समाजशास्त्र विषयातले आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रासह देशातल्या शेतकरी चळवळीचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बुधवारी डॉ. धनागरे यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.