विदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके
यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे.
लातूर : यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे.
बळीराजा आभाळाकडे पाहत वरुणराजाची आतुरतेने वाट पहातोय. नाम फाउंडेशनतर्फे गावक-यांच्या सहभागातून नाल्यांचं खोदकाम आणि रुंदीकरण करण्यात आलंय. स्थानिक ग्रामस्थांनी उन्हातान्हात घाम गाळत या बंधा-यांच्या खोदीकरणारणाचं काम केलयं. आता सगळ्यांना ओढ आहे ती वरुणराजाच्या दर्शनाची. कधी एकदा वरुणराजा बरसतोय आणि तहानलेली ही जमीन आणि कोरडे पडलेले बंधारे भरून वाहतील अशी आशा तळागाळातल्या शेतक-यांना लागलीये. मात्र सध्यातरी या ओसाड जमीनीकडे आणि कोरड्या बंधा-यांकडे पहातच बळीराजाला एक एक दिवस पुढे मोठ्या मुश्किलीने ढकलावा लागतोय.