जयेश जगड, अकोला : आता मालमत्तांचा सर्व्हे ड्रोनद्वारे करण्यात येणारे आहे. शुक्रवारपासून या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. अशा प्रकारे मालमत्तांचा सर्व्हे करणारी अकोला राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला शहरात ड्रोनद्वारे मालमत्तांचा सर्व्हे करण्यात येतोय. यूव्ही ड्रोनद्वारे मालमत्तांची थ्रीडी इमेज काढून मालमत्तेचं मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. मालमत्तेची थ्रीडी इमेज तयार होत असल्यानं आता भेदभाव होणार नाही आणि नागरिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. जीएसआय प्रणालीद्वारे हे काम पूर्ण झाल्यास 70 ते 80 कोटींची भर महापालिकेच्या महसुलात पडणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिलीय. 


अमरावतीतल्या स्थापत्य कन्सल्टन्सीसह या कामासंदर्भात करार करण्यात आलाय. इंटरनेटच्या माध्यमातून गुगलद्वारे मालमत्तांचं घेतल्या जाणारं छायाचित्र अचूक आणि स्पष्ट नसल्याचं स्थापत्य कंपनीच्या निदर्शनास आल्यामुळे कंपनीनं केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या पुण्यातल्या 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क'शी संपर्क साधत अत्याधुनिक ड्रोनची व्यवस्था केलीय. 


जीआयएसप्रणाली द्वारे टिपण्यात आलेलं चित्र गुगल मॅपवर असलेल्या चित्रांपेक्षा पाच पट अधिक स्पष्ट आहेत. सध्या महानगरपालिकाकडे 97 हजार मालमत्तेची नोंद आहे. या प्रणाली द्वारे सर्व्हे झाल्यानंतर मालमत्तेच्या आकड्यात निश्चितच वाढ होण्याची शक्यताय.  


अशा पद्धतीनं मालमत्तांचा सर्व्हे करणारी अकोला महानगरपालिका ही राज्यातील पहिला महापालिका ठरलीय.