दुष्काळ : सोलापुरात भाजपची बॅनरबाजी, शामियानाचा खर्च लाखोंच्या घरात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून सोलापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आगमनानिमित्त भाजपकडून सोलापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर स्वागत शामियानाचाच खर्च लाखोंच्या घरात असल्याने विरोधकांकडून टीका होत आहे.
फडणवीस आणि गडकरी सोलापुरात आज भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या शामियानाचाच खर्च लाखोंच्या घरात गेला आहे. दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार प्रकार असल्याची टीका यावर होत
सोलापूर शहरातल्या दोन उड्डाणपुलांसह जिल्ह्यातून आसपासच्या राज्यांना जोडणा-या महामार्गांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सोलापुरात होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे फ्लेक्सचे बॅनर लावण्यासाठी भाजपनं कोणताही परवाना घेतला नसल्याची माहितीही समोर आलीय.
दरम्यान, या कार्यक्रमात भाजपतर्फे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहेत. मात्र कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हा निधी अगदीच तुटपुंज्या स्वरुपाचाच ठरणार आहे.
काँग्रेसनं या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली असून, हे सरकार केवळ मार्केटिंग करणारं सरकार असल्याची टीका त्यांनी केलीय.