अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील ३२ वर्षीय तरूण शेतक-याने आत्महत्या केली. सततचा दुष्काळ, शेतमालाला नसलेला भाव, हप्ते थकल्याने खासगी फायनान्स कंपनीने घरासमोरील ट्रॅक्टर सुद्धा ओढून नेल्याने निराश झालेल्या ज्ञानेश्वर एकनाथ निक्ते याने राहत्या घरी गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ निक्ते यांना सहा एकर जिरायती शेती आहे. गेले सलग तीन-चार वर्ष दुष्काळ तर मागील वर्षी पाऊस होवूनही शेतमालाला भाव नसल्याने एकनाथ निक्ते आर्थिक अडचणीत होते. 


दरम्यान त्यांनी जोडधंदा म्हणून एका खाजगी फायनांस कडून ट्रैक्टर घेतला होता. मात्र शेतमालाचे भाव कोसळल्याने गेल्या काही महिन्यात ते कर्जाचे हप्ते भरु शकले नव्हते. अशात फायनांस कंपनीने हप्ते थकल्याने घरा समोरील ट्रैक्टर ओढून नेल्याने त्यांच्या नैराश्यात अजुन भर पडली होती. या नैराश्यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा आज संपवली.