मुंबई : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर  करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, साखरपा परिसरात रात्री भूकंपाचे दोन ते तीन धक्के बसले. देवरुखला 12.50 वाजता  भूकंपनाचा तीव्र स्वरुपाचा धक्का तर कोयना, साताऱ्यात 12.37 वाजता भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.


रत्नागिरीत रात्री 12.58 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. रत्नागिरीतही 4.3 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. सातारा परिसरातील अलोटी गावात जमिनीखाली १० किमीवर भूकंपाचे केंद्र आढळले. दरम्यान, जपानमध्ये दोन दिवसांपूर्वीही भूकंप झाला होता.