जळगाव : गजानन पाटील लाचखोरीप्रकरणी एसीबीकडून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चीट देण्यात आलाय. विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात खडसेंच्या नावाचा उल्लेखच नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली आहे. गजानन पाटील लाच प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एसीबी न्यायालयात, एसीबीनं आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात एकनाथ खडसेंच्या नावाचा समावेश नाही.


विशेष म्हणजे गजानन पाटील याला ज्या ठिकाणाहून एसीबीनं ताब्यात घेतले, ते ठिकाण म्हणजे एकनाथ खडसे यांचे मंत्रालयातलं दालन होते. मात्र एसीबीने आपल्या आरोपपत्रात खडसेंच्या दालनाचा उल्लेखच केलेला नाही. त्याऐवजी एसीबीनं परस्पर घटनास्थळाचा उल्लेख मंत्रालय असा केला आहे. 


तब्बल एक हजारापेक्षा जास्त पानांच्या या आरोपपत्रात, फक्त गजानन पाटील यालाच आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे एसीबीने एकनाथ खडसेंना सरळ क्लीन चीट दिल्याचे यातून स्पष्ट होते आहे. खडसेंना वाचविण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा आहे.