मुंबई : महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत १० महानगरपालिकासाठी उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हापरिषद मतदान 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आधी १५ जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपुर विभागांचा समावेश आहे. १६ फ्रेबुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.


कोकण आणि पुणे जिल्ह्यात मतदान दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे. २१ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.   


४ मार्चला १० महानगरपालिकांची मुदत संपत आहे. १० महानगरपालिकांच्या निवडणूका एकाचं टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.


१२ ते १७ जानेवारीपर्यंत मतदार यादीबाबत आक्षेप नोंदवता येणार आहे. २१ जानेवारीला अंतिम प्रभागनिहाय यादी जाहीर होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा विचार करुत निवडणुकीची तारीख ठरवली गेली असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.


आत्तापासून आचार संहिता लागू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून थांबणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचार १९ फेब्रुवारीला थांबणार आहे. एग्जिट पोल, जनमत चाचणीला  १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली आहे.