औरंगाबाद : पैठण येथील प्रचार सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेले वादग्रस्त विधान त्यांना चांगलेच भोवलेय. या वादग्रस्त विधानाप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैठणमधील प्रचार सभेत दानवे यांनी मतदानाच्या एक दिवस आधी संध्याकाळ महत्त्वाची असल्याचे सांगत त्यावेळी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असे विधान केले होते. दानवेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. 


मात्र विधान अंगाशी येताच त्यांनी सारवासारव केली. मी लक्ष्मीचे स्वागत करा असे म्हटले. स्वीकारा असे म्हटलेले नाही, असे दानवे म्हणाले. या विधानाप्रकरणी शनिवारी रात्री त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलीये.