नाशिक : गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्याच्या पंकज पारख यांचा सोन्याचा शर्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदला गेलाय. जगातला सर्वात महागडा शर्ट म्हणून गिनीज बुकनं या शर्टची नोंद घेतली आह. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहानपणापासून सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्या पंकज यांनी नाशिकच्या बाफणा ज्वेलर्सकडून हा शर्ट बनवून घेतला होता. हे डिझाईन दुबईच्या एका सोनाराचं असून तो घडवण्यासाठी १९ कारागिरांनी मेहनत घेतली होती. 


२०१४ रोजी आपल्या ४५व्या वाढदिवसानिमित्त ४ किलो सोन्याचा हा शर्ट त्यांनी सर्वप्रथम घातला. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया पारख यांनी दिली आहे.