पुणे : अचानक निघालेल्या मोर्चामुळे जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इव्हीएम मशीनमधील कथित घोटाळ्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी, आंदोलकांनी इव्हीएम मशिनची अंत्ययात्राच काढली. या आंदोलनासाठी पराभूत उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 


पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोर्चाचे बालगंधर्व रंग मंदीरासमोर सभेत रुपांतर झालं. उल्लेखनीय म्हणजे, पोलिसांची परवानगी नसताना इव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.