नागपूर : आजारी पडल्यावर आपण काय करतो? अर्थात डॉक्टरकडे जातो... हाच डॉक्टर अनेकांचे जीव वाचवतो... म्हणून त्याला आपल्या संस्कृतीत देवाचा दर्जा देतो. पण, तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय, तो खरोखरचा डॉक्टर आहे की कम्पाऊंडर... की बँक कर्मचारी... की सफाई कामगार... की पत्रकार...? 


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी 24 तास'चे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांचा हा बोगस डिग्रीचा पर्दाफाश करणारा स्पेशल रिपोर्ट...  आजपर्यंत तुम्ही बोगस डॉक्टर विषयी ऐकलं असेल पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कशा पद्धतीने बोगस डॉक्टर तयार  होतात ते... अवघ्या काही हजारात वैद्यकीय पदवी विकली जात असून हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत... खुले आमपणे हे बोगस डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.


वैद्यकीय क्षेत्राताल्या विविध पदव्यांची मोठ्या गोपनिय पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली... त्याआधारे आम्ही अशा पदव्यांची विक्री करणाऱ्यांचा शोध सुरु केला. अखेर आमची भेट झाली एका अशा व्यक्तीशी जो  अवघ्या काही रुपयांच्या बदल्यात बोगस पदव्यांची करतो आहे. अवघ्या काही हजारात सैदा पक्का झाला.  


नागपूरमध्ये अशा बोगस डिग्री देणारं एक रॅकेट कार्यरत आहे. यातल्या लोधे नावाच्या एका मध्यस्थाची आमच्या रिपोर्टरनं भेट घेतली. राम पवार नावाच्या दुसऱ्या एकाच्या सांगण्यावरून या लोधेचा रेफरन्स मिळाला... रिपोर्टर अखिलेश हळवे आणि लोधे यांच्यातल्या पहिल्या भेटीचं स्टिंग ऑपरेशन तुम्हाला खालील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 


यावेळी, एजंट लोधे आणि अखिलेश हळवे यांच्या पहिल्या भेटीत प्राथमिक चर्चा झाली... त्यानंतर झालेल्या भेटीत पैशांचा व्यवहार झाला... किती हजारात कुठ-कुठल्या डिग्री मिळणार, काय-काय कागदपत्रं देणार हे ठरलं... धक्कादायक म्हणजे धाड पडली तर आपण बोगस डॉक्टर कसे नाही, हे सिद्ध करणारे पेपर्सही देण्यात येणार आहेत... एखाद्या भाजी बाजारात चालावं तसं बार्गेनिंगही चाललेलं तुम्ही या व्हिडिओत पाहू शकाल. 


पैशांची बोलणी झाल्यावर हा सौदा ठरला आणि आमचे रिपोर्टर अखिलेश हळवे पैसे जमा करायला पुन्हा लोधेंना भेटले... त्यावेळी काय घडलं हेही तुम्ही या व्हिडिओत पाहू शकाल...