नागपूर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सराकरवर जोरदार हल्ला चढवला आहे. विखे पाटील यांनी सरकारची तुलना ही डोरेमॉन या कार्टुनशी केली आहे. सरकार हे डोरेमॉन आहे आणि ते जनतेचा नोबिता म्हणून वापर करत असल्याची टीका त्यांनी केली.


त्याचप्रमाणे सरकारमध्ये निर्णय घेण्याची परिपक्वता नाही. नोटबंदीमुळे भ्रष्टाचा-यांना नाही तर सामान्यांना सर्वाधिक फटका बसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या चाहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.