मुंबई: राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येची फॅशन सुरु आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी. या वक्तव्यामुळे गोपाळ शेट्टी चांगलेच अडचणीत यायची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बेरोजगारी आणि उपासमारीमुळे होत नाहीत, आत्महत्या ही सध्या फॅशन आहे, ट्रेंड आहे, असं शेट्टी म्हणालेत. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना 5 लाख रुपये देत असेल तर इतर राज्य 6 लाख किंवा 7 लाख देतात, ही स्पर्धा लागली आहे, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली आहे. त्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांनंतर टीका होऊ लागताच शेट्टी यांनी सारवासारव सुरू केली आहे. आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


 दरम्यान जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकरी आत्महत्या थांबतील. या योजनेमुळे जनतेचा पैसा जनतेकडे जाईल, आधी जनतेचा पैसा कॉन्ट्रॅक्टर्सकडे गेला, अधिकारी आणि राजकारण्यांच्या दलालांना देण्यात आला, पण आता असं होणार नाही, असंही गोपाळ शेट्टी म्हणाले आहेत.