धुळे : बाजार समिती गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. चलन तुडवाडयांमुळे व्यापाऱ्यांनी आणि समितीने हा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो शेतकऱ्यांना आणि हमाल मापाडीना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे एन सुगीच्या दिवसात बाजार बंद असल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी झाली आहे, तर बाजारात शेतमाल विक्रीला येत नसल्याने हमाल मापाडींवर उपासमारीची वेळ आली आहे. 


धुळ्याच्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज शेकडो शेतकऱ्यांचा राबता होता . शेतमलालने भरलेले शेड असायचे ती बाजार समिती गेल्या दहा दिवसापासून मनुष्यरहित झाली आहे. शेकडो कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. 


शेतकऱ्याचा मालच येत नसल्याने इथे सर्वत्र बेरोजगारीचे भूत कामगारांच्या मानगुटीवर बसले आहे. हाताला काम नसल्याने बाजार समितीतील सुमारे ५०० वर हमाल मापाडी आणि अन्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ओस पडलेली बाजरी समिती पाहून हमाल दररोज आल्या पावलांनी परत फिरताय.  


दिवसाकाठी होणारे करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प असल्याने व्यापारीही हाथावर हात धरून बसले आहेत. चलन तुडवडा असल्याने आणि निर्देश पुन्हा पुन्हा बदलत असल्याने बाजार बंदची हि कोंडी कशी फोडावी या विचारात व्यापारी आहेत. यापुढे शेतकऱ्यांना चेक ने शेतमालाचा मोबदला देण्याच्या विचारात व्यापारी आहेत, मात्र निर्णय झालेला नाही. 


बाजार बंद, शेतकरी माल कुठे विकावा या विचारात, हमालांच्या हाताला काम नाही, डोळ्यासमोर दिसणारी भीषण उपासमारी त्यात व्यापारी बेजार त्यामुळे धुळ्यातील अर्थव्यवस्था चलन तुडवाड्यामुळे पूर्ण ठप्प झाली आहे.