चौसाळा  : बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले.  पिकविमा काढण्यासाठी अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्राची गरज होती, पण  गुरुवारपासून ७/१२ आणि ८-अचीही मागणी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली अडवणूक होत असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांनाच कोंडलं.


जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांचे गेल्या ३ दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 


गुरुवारी बँकेचा कारभार सुरूळीत होताच विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यापूर्वी पीक पेरा प्रमाणपत्रावर विमा भरला जात होता. आता नव्यानेच सात/बाराची मागणी होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत होते.