नाशिक : चांदवडमध्ये कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कांदा तसेच सोयाबीनच्या घसरत्या भावाने शेतकरी हवालदील झाला आहे. चांदवड बाजार समितीपासून चांदवड प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यांनी यावेळी मोर्चा काढला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तहसिलदारांनी निवेदन स्वीकारत कोणतेही आश्वासन न दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयाला टाळे ठोकलं. तसंच तहसिलदारांसह प्रांताधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांना कोंडून घेतले. 


एक तासानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टाळे उघडण्यात आले. आश्वासनाची पुर्तता तातडीने न झाल्यास पाच दिवसाने पुन्हा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.