यवतमाळ : आजच्या जगात मुलींनी जरी उंच झेप घेतली असली, मुलांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असल्या तरी वंशाचा दिवा मुलगाच हवा असा अट्टाहास आजही अनेक कुटुंबामध्ये कायम आहे. याच अट्टाहासापायी अनेक नवजात मुलींचे गळे घोटले जातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यवतमाळमध्येही अशीच धक्कादायक घटना घडलीये. चार मुलींपाठोपाठ पुन्हा जुळ्या मुली झाल्या म्हणून नवजात मुलीची हत्या केल्याची घटना घडलीये. 


प्रभू राठोड असं या नराधम पित्याचे नाव आहे. प्रभू राठोडची पत्नी रंजना हिला चार मुलीनंतर पुन्हा जुळ्या मुली झाल्या. वंशाचा दिवा होईल अशी आशा ठेवून असलेल्या या दाम्पत्याला पुन्हा एकदा मुलीच झाल्या.


यामुळे प्रभू राठोड त्याची पत्नी रंजना आणि आजीने मिळून नवजात मुलीची गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी आरोपी वडील प्रभू राठोडला अटक करण्यात आलीये.