मुंबई: मुलुंड येथील ऐरोली टोल नाक्यावर बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या दोन युवकांच्या मारामारीमध्ये एकाचा मृत्यू झालाय. आकाश गोहर असं या 21 वर्षीय बाऊन्सरचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्युटीच्या वेळेवरून दोन दिवसांपूर्वी आकाश आणि रवी कदम यांचा वाद झाला होता. सोमवारी सकाळी 7 वाजता ड्युटीवर आल्यावर या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. यावेळी रवीने आकाशच्या छातीवर बुक्कयांनी मारले आणि आकाश तिथेच खाली कोसळला. 


त्याला मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आरोपी रवी कदम याला नवघर पोलिसांनी अटक केलीय.