भाडं भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बसमधून उतरवलं
वाकडमधल्या `युरो स्कूल`ने बसचं वाढीव भाडे भरले नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडलीय.
कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : वाकडमधल्या 'युरो स्कूल'ने बसचं वाढीव भाडे भरले नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडलीय.
पिंपरी चिंचवडच्या वाकडमधल्या प्रतिष्ठित 'युरो स्कूल'च्या मुजोरपणाचा चांगलाच फटका विद्यार्थी आणि पालकांना बसलाय. बसचं वाढीव भाडं भरलं नाही म्हणून युरो स्कूलच्या बसमधून चार विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवलं तर आठ विद्यार्थ्यांना पिक अपसाठी बसच पाठवली नाही, असा आरोप पालकांनी केलाय.
यासंबंधी पालकांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पालक संघटनेचे अध्यक्ष अनुभा सहाय यांनी दिलीय.
संबंधित पालकांनी चर्चा करण्यासाठी शाळेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण शाळा प्रशासनानं त्यांना गेटवरच अडवत पोलिसांना पाचारण केलं. दूसरीकडे युरो प्रशासन यावर काहीही बोलायला तयार नाही.