जळगाव : व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अमळनेरातील एका व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याच आदेश न्यायालयाने दिले आहेत. तत्पुर्वी प्रकरणाची सायबर सेलकडून ३ दिवसाच्या आत चौकशी करावी असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू पांडुरंग महाजन आणि राहुल महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर महिलेचे आक्षेपार्ह फोटो शहरात काही दिवसापासून व्हॉटस अॅपवर व्हायरल झाले आहेत. आरोपीने हे फोटो सर्वात आधी एका व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकले होते.


या प्रकरणी आरोपीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवले आणि प्रेमसंबंध प्रस्थापित करून, आपले आक्षेपार्ह फोटो व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेळेवर गुन्हा दाखल केला असता, तर आपले फोटो व्हायरल झाले नसते असंही या महिलेने म्हटले आहे.


महिलांच्या तक्रारीची थेट दखल घेण्याचे आदेश असतानाही अमळनेर पोलिसांनी सुरूवातीला तक्रार दाखल केली नाही, तर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस खळबळून जागे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिस शहरातील काही राजकारण्यांच्या दबावाला बळी पडतात, अशी चर्चा शहरात आहे.