यवतमाळ : गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचे लाकडी व इतर फर्निचर साहित्य आणि भांडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा संशय व्य़क्त केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका स्टील सेंटरच्या आर्णी मार्गावरील गोदामाला अचानक  आग लागली. बघता बघता गोदामातून निघणाऱ्या आगीच्या लोडांनी संपूर्ण गोदाम व्यापले. 


दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळं आग आटोक्यात आणण्यासाठी रहिवाशांनी तातडीनं अग्निशमन दलाला सूचना दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या दोन गाड्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.