पुणे : पुण्यात टायरच्या दुकानाला आग लागलीये. पुणे-मुंबई हायवेवर वारजे इथं माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ ही घटना घडलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायरच्या दुकानाला लागलेली आग नंतर इमारतीतही पसरलीये. अग्निशमन दलाचे ४ बंब आणि २ टँकर घटनास्थळी दाखल झालेत. 


आगीत अद्याप कोणी जखमी झाल्याचं वृत्त नाही. शेजारीच आर स्वेअर नावाची बिल्डिंग आहे. आगीच्या झळा तिथपर्यंत पोहचल्या. पण वेळीच नियंत्रण मिळवल्यानं धोका टळला.