रत्नागिरीच्या आरजीपीपीएल कंपनीत सुरक्षा रक्षकाकडून अधिकारी सहकाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. क्षुल्लक वादातून यात दोघांचा बळी गेलाय. हरिशकुमार गौडने पत्नी आणि स्वत:वरही गोळीबार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी : गुहागर येथील आर जी पी पी एलच्या मुख्य प्रवेशद्वारात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एक थरार नाट्य घडलय. सी आय एस एफच्या जवानामध्ये झालेल्या बाचाबाचीतून हरिशकुमार गौड या सुरक्षा रक्षकाने आपले वरिष्ठ अधिकारी एएसआय बी.जी शिंदे यांच्यावर सर्वप्रथम गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 


गोळीबाराचा आवाज ऐकून पुढे आलेल्या बी रनीश या सीआयएसएफच्या काँन्टेबलवरही हरिशकुमार गौड याने गोळीबार केला. यात बी रनेश यांचाही मृत्यू झाला. यानंतर हातात रायफल घेवून हरिशकुमार गौड हा बराकच्या आसपास फिरत राहिला. त्याच्या हातामध्ये लोडेड रायफल होती आणि त्यातून तो वेळोवेळी फायरिंग करत होता. संतापाच्या भरात गोळीबार करणाऱ्या हरिशकुमार गौड याला शांत करण्यासाठी कंपनीच्या आवारातच राहात असलेल्या त्याच्या गरोदर पत्नीला त्याच्या समोर आणण्यात आले. हरिशकुमार गौड यांनी आपल्या पत्नीला बराकच्या आतमध्ये घेत स्वतःला आणि पत्नीला बाथरूमच्या आत कोंडून घेतले.


या दरम्यानं गुहागर पोलिसांनी वारंवार हरिशकुमार गौड यांनी शरण येण्याचं आव्हान केलं. मात्र हरिशकुमार गौंड यांनी प्रतिसाद दिला नाही. अवघ्या काही वेळातच हरिशकुमारनं प्रथम आपली पत्नी आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.