ठाणे : ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर अनेक दिग्गजना हार पत्कारावी लागली तर काही नवीन चेहऱ्यांनी ही जिंकून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. तर जिंकणाऱ्यांमध्ये काही पती - पत्नी अश्या जोड्या ही आहेत. ठाण्यात जवळपास ५ अश्या जोड्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच घरात असे दोन नगरसेवक असल्यामुळे त्या परिसरच्या विकास कामाला याचा फायदाच होईल असा विश्वास त्यांनी दर्शविला आहे. ठाण्यातील गोकुळ नगर, श्रीरंग सोसायटी, वृंदावन अशा परिसरातून कृष्णा पाटील व त्यांच्या पत्नी नंदा हे दोघे भाजप पक्षातून निवडून आलेत. त्यांचे संपूर्ण पॅनलच निवडून आले आहे.


नंदा पाटील यांची ही दुसरी टर्म आहे पती कृष्णा हे पहिल्यांदा निवडून आलेत. या आधी कृष्णा यांच्या आई ही नगरसेविका होत्या. यांचे वडील शिसेनेचे मोठे कार्यकर्ते परंतु अलीकडच्या काळात काही वादावरून यांनी भाजप पक्ष स्वीकारला.


आम्ही निवडून आल्यामुळे या भागातील विकास कामे जलद होणार आहेत कारण २०१२ मध्ये दोन पॅनल सिस्टम होती तेव्हा जे दोन नगरसेवक एकाच पॅनल मधून निवडून आले होते आणि त्यात कधी हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असायचे किंवा एकाचाच पक्षाचे असले तरी दोघांच्या पटायचे नाही आणि त्यामुळे परिसराची कामे रखडून राहायची. परंतु आता दोन्ही नगरसेवक एकाच घरातील असल्यामुळे हा वाद होणार नाही, अशी चर्चा आहे.


कोणी एक जरी कामात असला तरी दुसरा लोकांना घरी भेटू शकतो आणि त्यामुळे विकास कामात कोणताही अडथळा येणार नाही, असे पाटील पती पत्नी यांनी सांगितले.


असेच आणखी शिवसेनेचे संजय भोईर - उषा भोईर, शिवसेनेचेच एकता भोईर - एकनाथ भोईर तर राष्ट्रवादीचे मुकंद केणी - प्रमिला केणी व राष्ट्रवादीचेच राजन किणी आणि अनिता किणी या पती पत्नीच्या जोड्या निवडणुकीत निवडून आल्यात.