कोल्हापूर : दोन वेगवगळ्या रस्ता अपघातात 9 जण ठार झाल्याची घटना घडलेय. बिदरमधील कार अपघात मुंबईचे 6 जण जागीच ठार झालेत. तर महाड येथील अपघातात तिघे ठार झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या प्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या कारला कर्नाटकमधल्या बिदर तालुक्यातल्या बसवकल्याण इथे अपघात झालाय. अपघातात मुंबईचे 5 जण जागेवरच ठार झालेत. ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या टकरीमुळे हा भीषण अपघात झाला.


ट्रक आणि कारमध्ये रात्री NH 9 या महामार्गावर हा भीषण अपघात झाला. आपघातातील इतर जखमींना हैदराबादमधील आपोलो हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.