सांगली : सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे. गेल्या नऊ वर्षांची नीलेशची तपश्चर्या फळाला आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णेच्या पाण्यावर त्यानं सलग दोन तास तरंगण्याचा विक्रम पूर्ण केला आहे. २४ वर्षाच्या नीलेशला लहापणापासून पोहण्याची आवड होती, गेल्या नऊ वर्षात त्यानं पाण्यावर योग्यभ्यासाची कलाही अवगत करून घेतली. 


नीलेशच्य़ा कुटुंबात शेती हाच प्रमुख व्यवसाय त्यानं कृषीमहाविद्यालयातूनच पदवीही घेतली आहे, पण पुस्तकी ज्ञानापलिकडे अंगात काहीतरी कला बाणवण्याची त्याची उर्मी त्याला आज इथपर्यंत घेऊन आली आहे.


सिद्धासन, पद्मासन, गरुडासन, पर्वतासन, शवासन...नाव घ्या...ते योगाआसन नीलेशनं पाण्यावर करून दाखवलं. त्यासाठी पंचक्रोशीतले नागरिक यावेळी पद्माळ्याच्या कृष्णातीरी आवर्जून उपस्थित होते. नीलेशचा मित्रपरिवारही मोठा...त्यामुळे त्यानं केलेल्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाल्यावर मित्रांनी त्याला खांद्यावर घेऊन जल्लोष साजरा केला...


आई-वडिलांनाही नीलेशच्या या अनोख्या विक्रमाचा सार्थ अभिमान आहे.सांगलीच्या क्रीडा भारती आणि तासगावच्या श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टनं नीलेश जगदाळे सारख्यांचा नेहमीच हुरूप वाढवलाय.मेहनत केली काय साध्य होऊ शकतं...हे नीलेश जगदाळेच्या या अनोख्या कलेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.