कोल्हापूर : शहरासह जिल्हा जलमय झाला आहे. शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटी कार्यरत आहे. कोल्हापुरात 2005 नंतर प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्थिती ओढवली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 45 फुट 6 इंचावर येऊन पोहचली आहे. त्यामुळं जल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावात आणि कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी घुसलंय. कोल्हापूर-गगणबावडा हा राज्यमार्ग गेल्या ३ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळं या भागातील नागरीक पाण्यातून वाट काढत बाहेर पडत आहेत.


कोल्हापूर शहरातील शाहुपुरी भागात पाणी शिरलंय. कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर परिसर जलमय झालाय. त्यामुळे इथल्या एक हजाराहून अधिक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अशा पुरस्थितीत मदतकार्यासाठी प्रशासन सरसावलं आहे. एनडीआरएफची टीमचीही मदत घेतली जात आहे.


पुराच्या पाण्यात 8 मुलं वाहून गेली आहेत. त्यातील सहा मुलांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. तर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. गगनबावडा तालुक्याच 293 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झालीये. राधानगरी धरण 72 टक्के , दुधगंगा धरण 37 टक्के तर वारणा धरण 58 टक्के भरलंय. 2005 नंतर पहिल्यांदाच अशी गंभीर पुरस्थितीला सामोरं जावं लागत असल्यानं प्रशासनाची चांगलीच कसरत होते आहे.