अतिवृष्टीच्या नुकसानीला पंचनाम्याशिवाय मदत-सीएम
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात आधी दुष्काळ आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात आधी दुष्काळ आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
यासाठी राज्यसरकारकडून भरपाई दिली जाणार आहे, मात्र यासाठी कोणत्याही पंचनाम्याची गरज नसेल, सर्वांना सरसकट भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पंचनाम्याच्या जाचापासून सुटका होणार आहे, तसेच गरीब शेतकऱ्यालाही न्याय मिळणार आहे.
अनेकदा याबाबतीत अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. महसूल विभाग कृषी विभागाकडे आणि कृषी विभाग महसूल विभागाकडे त्रुटी दाखवतं असतं, या प्रकाराला आता पूर्णविराम मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला की त्यांना तातडीनं मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.