सांगली : पंढरपूर येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास भुईटे यांची हत्या धारधार शस्त्राने वार करुन करण्यात आली. कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. ही घटना खिरशिंग फाट्याजवळ ही घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूर येथील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास तथा नामदेव भुईटे  यांची हत्या झालीय. हत्येच्या या घटनेने सांगली हादरली. डोक्यावर आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्यांरांनी घाव घालण्यात आलेत. 


भुईटे यांच्या हाताची बोटे देखील हल्लेखोरांनी छाटली आहेत. मिरज-पंढरपूर रस्त्यावर हत्येसाठी वापण्यात आलेले कोयते जप्त करण्यात आले आहेत.