माजी आमदार रमेश कदमांचा राष्ट्रवादीला राम राम
रत्नागिरीतले माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. तसेच तटकरे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे त्यांनी पक्ष सदस्याचा तसेच इतर पदांचा राजीनामा दिलाय.
रत्नागिरी : रत्नागिरीतले माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. तसेच तटकरे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे त्यांनी पक्ष सदस्याचा तसेच इतर पदांचा राजीनामा दिलाय.
चिपळूण नगरपालिकेत राष्ट्रवादीचा पराभव राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी केल्याचा रमेश कदमांचा दावा आहे. त्यामुळेच पक्ष सोडत असल्याचं कदमांनी म्हटलंय. आता शरद पवारांचा फोन आला तरी मागे फिरणार नसल्याचंही कदमांनी स्पष्ट केलंय.
रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे संकेत मिळालेत.