नंदूरबार : नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमी सात जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदूरबारपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पाचोराबारीत पावसाचा कहर इतका प्रचंड आहे की त्यात शेकडो घरांचं मोठं नुकसान झालंय तर शंभर जनावरंही या पाण्यात वाहून गेलीत. 


अवघ्या काही तासांत ३८० मिलीमीटर अतिवृष्टी झाल्यानं गावात सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झालीय.