अश्विनी पवार,  झी मीडिया, पुणे : परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर परदेशात नोकरी करायची इच्छा असेल आणि तसं आश्वासन जर कोणी देत असेल तर सावध रहा ...  कारण परदेशात नोकरी द्यायच्या आमिषाने पुण्यातील अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेलाय..ग्लोबल स्टार्स मँनेजमेंट प्रायवेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून पुण्यातील धनकवडी येथून कंपनीचं कामकाज चालत असे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून या आँफिस ला टाळ लागलयं..... 


सुरवातीच्या काळात येणा-या तरुणांना सिंगापुर, मलेशिया, दुबई यांसारख्या देशांमध्ये नोकरी देण्याचं आमिश देऊन या कंपनीने त्यांच्या कडून लाखो रुपयांची वसुली केली.. नोकरी लावुन देण्याची ग्वाही देखील दिली.. परंतु पैसे भरून अनेक दिवस उलटल्यावरही पैसे भरणा-या पैकी एकाही तरुणाला नोकरी दिली गेली नाही... या उलट व्हिजा बनविण्याच्या नावाखाली पासपोर्ट देखील त्यांच्या कडील पासपोर्ट देखील घेतले गेले


पैसे भरुनही नोकरी न मिळाल्याने जेव्हा तरुण आक्रमक झाले तेव्हा त्यांना मुलाखती साठी सिंगापुर ला पाठवण्यात आलं... तिथे गेल्यावर सगळा खर्च ग्लोबल स्टार्स कडुन केला जाईल असं सांगण्यात आलं होतं...मात्र सिंगापुर ला गेलेल्या तरुणांना नोकरी कर मिळाली नाहीच मात्र आपल्याकडील परतीची तिकीट नकली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि ग्लोबल स्टार्स ची फसवेगीरी उघडकीस आली.... कंपनीची फसवेगीरी उघडकीस आली... आणि स्वतच्या खर्चा ने त्यांना पुन्हा यावं लागलं


या बाबतीत पुण्यातील सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलयं उरलेल्या पाच आरोपींचा तपास सुरु असल्याचं  पोलिसांनी सांगितलयं... यामध्ये मुख्य आरोपी महम्मद सुलतान कुरवले याचाही समावेश आहे. 


पुण्यासह हैद्राबाद मध्येही ग्लोबल स्टार्स ची ब्रँच असल्याची माहिती फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलीये...त्यामुळे पुण्यातील या गुन्हेगारांचा शोध घेण्या सोबतच या कंपनीचं रॅकेट देशात कार्यरत असल्याची शंकाही या तरुणांकडून व्यक्त होते.